चारचौघात एकट बसण्यापेक्षा
... कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत..
आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत….
No comments:
Post a Comment